मागास क्षेत्र अनुदान निधी योजना (Backward Region Grant Fund) (BRGF) ही १००% केंद्र पुरस्कृत योजना आहे. सदर योजना ही सन २००७-०८ पासुन पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत सुरु करण्यात आली आहे. ही योजना राज्यातील १२ मागासलेलया जिल्ह्यामध्ये सन२००९-१०पासून राबविण्यात येते. या जिल्ह्यांची नावे पुढीलप्रमाणे -१)अहमदगनगर २) गडचिरोली ३) भंडारा ४) चंद्रपुर ५) गोंदिया ६) नांदेड ७) हिंगोली ८) धुळे ९) नंदुरबार १०) यवतमाळ ११) औरंगाबाद १२) अमरावती.
मागास क्षेत्र अनुदान निधी या योजनेचा मुख्य उदेश प्रादेशिक असमतोल दुर करणे व स्थानिक पायाभुत सुविधांमध्ये कच्चे दुवे जोडणे हा आहे तसेच या योजनेच्या माध्यमातुन पंचायत व नगरपालिका स्तरावरील स्थानिक प्रशासनास बळकटी देण्यासाठी वेगवेगळया सुविधा उपलब्ध करणे व याव्दारे संस्थांची क्षमताबांधणी करणे हा आहे.
योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्हयांचा विकास दृष्टीकोन (Vision Document) विचारात घेवुन लोकसहभागातून ग्रामसभेच्या मान्यतेने गाव आराखडा तयार करुन या गाव आराखडयाचे पंचायत समितीव्दारे एकत्रीकरण केले जाते. पंचायत समितीच्या आराखडयाचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत एकत्रीकरण करुन जिल्हा आराखडा तयार करण्यात येतो. या जिल्हा आराखडयास जिल्हा नियोजन समितीची (DPC) मंजुरी घेवुन राज्य शासना मार्फत पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे निधी उपलब्धतेसाठी पाठविण्यात येतात. जिल्हा आराखडे राज्य स्तरावरील उच्चाधिकार समितीच्या अवलोकनार्थ सादर केले जातात. योजनेची अंमलबजावणी, संनियंत्रण राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प व्यवस्थापन कक्षामार्फत केले जाते.
केंद्रशासनव्दारे राज्यशासनास निधी प्राप्त होतो व राज्यशासनाकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेस BDS व्दारे निधी वितरण केला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्दारे पंचायत समिती/ग्रामपंचायतीस RTGS व्दारे निधी वाटप केला जातो.
मागास क्षेत्र अनुदान निधी या योजनेतंर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार ग्राम पंचायत इमारती, संगणकीकरण, अंगणवाडी इमारती, अंगणवाडीसाठी किचनशेड, सौर पथदिवे, सिमेंन्ट रस्ते-नाले, गटारे, सार्वजनिक शौचालये, हातपंप दुरुस्ती, काँक्रीट रस्ता, विघुत पोल, पाईपलाईन दुरुस्ती, कंम्पाउंड वॉल (अंगणवाडी, ग्रा.पं., शाळा), सामुहीक भवन इ. विकास कामे करण्यात येतात.


निधी तपशिल: मागास क्षेत्र अनुदान निधी योजनेतर्गत सन२००९-१०ते २०१४-१५ पर्यंत तरतूद, प्राप्त निधी खर्च व एकूण कामाचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. | वर्ष | तरतुद | प्राप्त निधी | जिल्हांना वितरित निधी | खर्चीत निधी | एकुण कामाची संख्या | एकुण पुर्ण कामे |
---|---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
1 | 2009-10 | 253.57 | 228.19 | 228.19 | 195.85 | 12409 | 10877 |
2 | 2010-11 | 253.57 | 278.95 | 278.95 | 259.19 | 14186 | 11310 |
3 | 2011-12 | 280.57 | 250.03 | 250.03 | 270.62 | 14157 | 12176 |
4 | 2012-13 | 280.57 | 260.99 | 260.99 | 263.73 | 17019 | 13726 |
5 | 2013-14 | 344.10 | 236.80 | 236.80 | 263.52 | 15436 | 8536 |
प्रकल्पांतर्गत सर्व माहिती www.epanchayat.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.